दिग्दर्शक के.विश्वनाथ यांचे निधन

तरुण भारत लाईव्ह ।०३ फेब्रुवारी २०२३। तेलुगू आणि हिंदी सिनेविश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक कलातपस्वी के. विश्वनाथ यांचे गुरुवारी निधन झाले आहे. त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

तेलगू-हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून के विश्वनाथ हे गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी प्राणज्योत मालवली. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक होते. त्यांना पाच राष्टीय चित्रपट पुरस्कार सहा राज्य नंदी पुरस्कार, दहा फ्लीमफेयर  पुरस्कार दक्षिण आणि एक बॉलीवूड फ्लीमफेयर  पुरस्कार  प्राप्त झाले. तसेच त्यांना  २०१६ साली त्यांना ‘दादा साहेब फाळके’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. साठ वर्षांच्या चित्रपटाच्या कारकिर्दीत, विश्वनाथने विविध शैलीतील पन्नासहुन अधिक वैशिष्ट्यीकृत चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

वयाशी संबंधित समस्या असल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद मधील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आता त्यांच्या निधनानंतर तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.