केशव स्मृती प्रतिष्ठान भुलाबाई महोत्सवात दिव्यांग भगिनींनी सादर केले भुलाबाई गीत

---Advertisement---

 

चाळीसगाव : केशव स्मृती प्रतिष्ठान, जळगाव आणि रंगगंध कलासक्त न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भुलाबाई महोत्सवाची प्राथमिक फेरी नुकतीच पार पडली. विशेषतः मीनाक्षी निकम यांच्या ग्रुपने सादर केलेल्या भुलाबाई गीताला प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळाली. या सादरीकरणाचे वैशिष्ट्ये म्हणजे या ग्रुपचे सर्व स्पर्धक हे दिव्यांग होते.

ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात आली होती. स्पर्धेत चाळीसगाव शहरासह परिसरातील खेड्यांमधून एकूण २० संघांनी सहभाग नोंदविला. विविध शाळा, शिक्षक, विद्यार्थिनी, तसेच महिला वर्गाने उत्साहाने सहभाग घेतला. गेली २३ वर्षे केशव स्मृती प्रतिष्ठान भुलाबाई महोत्सव सादर करीत आहे. चाळीसगावमध्ये ही स्पर्धा दुसऱ्यांदा पार पडली.

यावेळी केशव स्मृती प्रतिष्ठानच्या प्रतिनिधी, तसेच भुलाबाई महोत्सव प्रमुख साधना दामले, सहप्रमुख वैशाली कोळंबे, इंदू फुसे उपस्थित होत्या. परीक्षक म्हणून नीता सामंत व अॅड. अपूर्वा दामले (जळगाव) उपस्थित होत्या. बक्षिसांची रक्कम रंगगंध कलासक्त न्यासचे अध्यक्ष डॉ. मुकुंद करंबळेकर यांनी दिली, तर चषक व प्रमाणपत्रे केशव स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली. यशस्वीतेसाठी डॉ. मीनाक्षी करंबळेकर, यतीन देव, भाग्यश्री शिनकर, भाग्यश्री देशपांडे, सुवर्णा कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.

विजेते संघ


लहान गट :
एच. एच. पटेल विद्यालय, जिल्हा परिषद शाळा बाणगाव
मोठा गट : डॉ. प्रमिला पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा शिंदी, डॉ. प्रमिला पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालय
उत्तेजनार्थ : राष्ट्रीय विद्यालय कन्या प्रशाला, डॉ. प्रमिला पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालय
खुला गट : व्ही. एच. पटेल प्राथमिक विद्यालय.

विजेत्या संघांना पारितोषिके

केशव स्मृती प्रतिष्ठान, जळगाव आणि रंगगंध कलासक्त न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भुलाबाई महोत्सव स्पर्धेत विजेत्या संघांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---