तरुण भारत लाईव्ह । वसंत गणेश काणे। बखमुत्का नदीच्या काठावर वसलेले बखमुट हे पूर्व युक्रेनमधील ukraine शहर नुसतेच एक शहर नाही तर ते एक महत्त्वाचे प्रशासकीय आणि आज तर एक सामरिक केंद्र झाले आहे. म्हणून रशियाने ukraine या शहराला वेढा घातला असून काय वाटेल ते करून हे शहर जिंकायचेच, असा निर्धार केला आहे. या शहरातील जवळजवळ सर्व म्हणजे ७१,००० नागरिक बाहेर पडले असून आज या शहरात भग्नावशेषांशिवाय फारसे काही शिल्लक उरलेले नाही. तरीही रशियासारखाच निर्धार करून युक्रेनच्या ukraine फौजाही लढत असून, हे शहर रशियाच्या हाती पडू नये, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. या संघर्षाचा निकाल केव्हा लागेल हे नक्की सांगता येत नसले तरी काय लागेल, ते स्पष्ट दिसते आहे. आज ना उद्या रशियाच्या हायपरसॉनिक मिसाईल्सच्या माऱ्यापुढे टिकाव धरू न शकल्यामुळे हे शहर रशियाच्या हाती पडेलच. पण कडवी झुंज कशी असते आणि सर्वस्वाचा नाश म्हणजे काय, याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून या संघर्षाची नोंद इतिहासात नक्कीच घेतली जाईल. जिथे एकेकाळी टोलेजंग इमारती होत्या तिथे आता फक्त दगडाविटांचे ढिगारेच काय ते दृष्टीला पडतील.
पत्रपंडितांचे अंदाज फोल ठरले
आता वर्षभरापेक्षा काही अधिक दिवस मागे जाऊया. २४ फेब्रुवारी २०२२ ला रशियन तोफगोळ्यांची युक्रेनवर ukraine बरसात सुरू झाली होती. युक्रेन जेमतेम एक आठवडा तग धरेल असे पत्रपंडितांना वाटत होते. पण मार्च २०२३ मध्येही युक्रेन इंच इंच लढवीत रशियाचा दमदारपणाने सामना करीतच आहे. या युद्धात युक्रेनचे ukraine खूपच नुकसान झाले, पूर्व युक्रेन जवळजवळ बेचिराख झाला, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पण युक्रेनच्या तुलनेत रशियाची हानीही काही कमी झाली नाही, याचे मात्र आश्चर्य वाटते. युक्रेनला युरोप आणि अमेरिकेने सर्वप्रकारे मदत केली हे सत्य असले तरी, शस्त्रे लढत नसतात, लढले ते युक्रेनचे ukraine सैनिकच, हे विसरून चालणार नाही. अमेरिकेने अफगाणिस्तानलाही शस्त्रास्त्रे पुरविली होती, तिथे तर सोबत अमेरिकन सैनिकही थांबले होते. पण अफगाणिस्तानचे सैनिक लढलेच नाहीत. अनेक तर शस्त्रास्त्रांसह सरळ तालिबान्यांनाच जाऊन मिळाले, हा इतिहास तसा ताजाच आहे. युक्रेनची ख्याती अगदी उलट आहे. युक्रेनने आक्रमकांना चोख उत्तर दिले. सर्व दृष्टींनी चौपट मोठ्या रशियाशी युक्रेनचे नेतृत्व, सैनिक आणि सामान्य नागरिकही ज्या जिद्दीने लढा देत आहेत, त्याला दाद द्यायलाच हवी.
ज्यो बायडेन यांची युक्रेन भेट
युक्रेनवरील आक्रमणाला एक वर्ष होत असताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेबरोबरच्या अण्वस्त्र निर्मिती नियंत्रण करारातून माघार घेऊन अमेरिकेसह सर्व जगालाही भावी आण्विक युद्धसंकटाची जाणीव करून दिली आहे. अर्थात लगेचच जगात आण्विक युद्ध सुरू होईल, असे वाटत नाही. हा दबावतंत्रातील एक नवीन डावही असू शकेल. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पोलंडमधून १० तास रेल्वेने प्रवास करून युक्रेनला ukraine नुकतीच भेट दिली आहे. या भेटीने त्यांनी दोन उद्देश साध्य केलेले दिसतात. अमेरिकेने रशियाला जाणीव करून दिली आहे की, आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालीत नाही. असे करतानाच त्यांनी युक्रेनला ukraine धीर आणि भरवसा दिला की, अमेरिका तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. त्यांनी पुतिन यांचा धिक्कारही केला. पण युद्धाची झळ सोसणाऱ्या जगाला त्यांनी जाणीव करून दिली की, युक्रेनचे युद्ध सुरूच राहणार असून जगाने हे वास्तव गृहीत धरून आपली भविष्यातली धोरणे आखावीत. अमेरिका आणि रशिया यांनी जगाला शांततेची अपेक्षा ठेवू नका असे जाणवून देऊन अंधारात ठेवले नाही, हे एकप्रकारे बरेच झाले.
शॅडो बॉक्सिंग
रशिया युक्रेनवर ukraine चालून गेला तेव्हा हे युद्ध लवकर संपेल असा त्याचा आडाखा होता. पण झाले भलतेच. युक्रेनने रशियाला थोपवण्यासाठी कडवी झुंज दिली. त्यामुळे आता माघार घेतली तर नामुष्की आणि लढतो म्हटले तर पुरती दमछाक झालेली, अशा पेचात रशिया सापडला आहे. अमेरिकेला अशा प्रकारची अडचण तूर्तास तरी नाही. उलट अमेरिकन रक्ताचा एकही थेंब सांडू न देता, अमेरिकेने रशियाला फार मोठी किंमत मोजायला भाग पाडले आहे. स्वत: प्रत्यक्ष युद्ध न करता अन्य उपायांनीही प्रतिपक्षाला कसे नामोहरम करता येते, याचा हा एक उत्तम वस्तुपाठ ठरावा. बॉक्सिंगच्या खेळात शिकाऊ बॉक्सर समोर प्रतिस्पर्धी उभा आहे अशी कल्पना करून ठोसे मारून आपली ठोसे मारण्याची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करीत असतो. याला शॅडो बॉक्सिंग असे म्हणतात. रशिया आणि अमेरिका यांचे असेच चालू आहे की काय अशी शंका काहींनी व्यक्त केली आहे. काही शस्त्रे दोघांजवळही अशी आहेत की, ज्यांची प्रत्यक्ष लढाईतील परिणामकारकता अजून पारखलीच गेली नव्हती. तो हेतू युक्रेन ukraine युद्धाच्या निमित्ताने दोघांचाही साध्य झाला आहे. यावेळी टांगता लोड म्हणून युक्रेनचा वापर करण्याची संधी चालून आली आणि या दोन महासत्तांनी तिचा पुरेपूर उपयोग करून घेतला. फरक इतकाच आहे की बॉक्सरसमोर टांगलेला लोड निर्जीव असतो तर युक्रेन हे एक सजीव राष्ट्र आहे.
नाटोसमोरील पेच
युरोप आणि अमेरिकेकडून होणाऱ्या शस्त्रांच्या पुरवठ्याच्या भरवशावरच युक्रेन ukraine हे युद्ध रशियासारख्या महाशक्तीबरोबर लढतो आहे, हे स्पष्ट आहे. याचा अर्थ असा आहे की, युक्रेन युद्धात नाटो अप्रत्यक्ष रीत्या सहभागी आहेच. नाटो ही अल्बामा, बेल्जियम, बल्गेरिया, कॅनडा, क्रोएशिया, झेक रिपब्लिक, डेन्मार्क, एस्टोनिया, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आईसलंड, इटली, लॅटव्हिया, लिथुनिया, लक्झेंबर्ग, माँटेनिग्रो, नेदरलंड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमॅनिया, स्लोव्हॅकिया, स्लोव्हॅनिया, स्पेन, टर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स या ३० देशांची लष्करी संघटना आहे. पण नाटो हात राखूनच मदत करतो आहे. युक्रेनला ukraine आता विमानांची गरज आहे. झेलेन्स्कींची ही मागणी अद्याप कुणीही फेटाळलेली नाही. पण अजून तरी युक्रेनला हवी असलेली विमाने दिलीही नाहीत. शस्त्रास्त्रे, दारूगोळा यांची मदत करणे तुलनेने सोपे आहे. शस्त्रास्त्रांसह दारूगोळा विमानात चढवला आणि दिला पाठवून, की झाले. वैशिष्ट्यपूर्ण विमानांचे तसे नसते. एकतर त्यांच्या पायलटांना प्रशिक्षण द्यावे लागते, त्याला वेळ लागतो. युक्रेनला ukraine तर मदत तातडीने हवी आहे. बरे चालक आणि पायलटांसह रणगाडे आणि विमाने पाठविणे म्हणजे नाटोने प्रत्यक्ष युद्धात उतरणेच झाले की. असे झाले तर रशियासमोर अण्वस्त्रे वापरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. इथपर्यंत रशियाला रेटीत न्यायचे किंवा कसे हा निर्णय सोपा नाही. चालक आणि पायलटांसह रणगाडे आणि विमाने पाठविण्याला नाटोच्या सर्वच सदस्य राष्ट्रांचे समर्थन मिळणार नाही, हीसुद्धा एक अडचण आहेच. हंगेरी आणि इटली यासारख्या नाटो सदस्य राष्ट्रांचे रशियाशी विशेष सख्य आहे. त्यांचा या निर्णयाला पाठिंबा मिळणार नाही आणि नाटोत फूट पडलेली अमेरिकेला परवडणार नाही. असे असले तरीही युक्रेनचे ukraine दोन पायलट विशेष प्रकारची विमाने उडविण्याचे शिक्षण अमेरिकेत घेत असल्याचे चित्रण नुकतेच समोर आले आहे. याबाबत कोणतीही प्रतिक्रिया रशिया किंवा चर्चा आणि मुत्सद्देगिरीने हा प्रश्न सोडवाना असे मानणाऱ्यांकडून अजूनतरी समोर आलेली नाही.
चीनचा दुटप्पीपणा
हे युद्ध थांबावे, असेच सर्व जगाला वाटते. यात रशिया आणि युक्रेन ukraine हेही आले. फरक इतकाच की, युद्ध थांबावे पण जिंकलेला भूभाग आपल्याच हाती राहावा, असे रशियाला वाटते तर युद्ध थांबण्यापूर्वी रशियाने बळकावलेली युक्रेनची इंच न इंच जमीन आपल्याला परत मिळालीच पाहिजे, हा युक्रेनचा ukraine आग्रह आहे. पुतिन यांच्या अहंकाराला बाधा पोचणार नाही आणि युक्रेनलाही आपला भूभाग परत मिळेल, अशी तडजोड अशक्यच आहे. अशा परिस्थितीत हा संघर्ष संपवायचा कसा हा प्रश्नच आहे. अनौपचारिक स्तरावर आणि या कानाचे त्या कानाला कळू न देता सगळेच एकमेकांच्या संपर्कात आहेत. जर्मनी आणि इटलीचे प्रमुख भारतात आले ते केवळ जी-२० च्या बैठकीसाठी नाही. जी काय चर्चा व्हायची त्यात भारत सगळ्यांनाच हवा आहे. कारण युक्रेन ukraine आणि रशिया यात संघर्ष सुरू झाला त्या दिवसापासून खरी तटस्थता जर कुणी पाळली असेल तर ती भारताने. युद्धबंदी झाली तर तिचे श्रेय भारतालाच मिळेल. हे चीनला सहन होण्यासारखे नाही. चीनने रशियाशी मदत करण्याचा करार केला खरा पण रशियाला हवी असलेली मदत केली नाही, जी मदत केली ती हात राखून केली. कारण रशिया कमजोर झाला तर चीन साम्यवादी गटात पहिल्या क्रमांकावर असेल. या बरोबर युद्धबंदी घडवून आणण्याचे श्रेयही आपल्यालाच मिळावे, यासाठी चीनची धडपड सुरू आहे. चीनची ही भूमिका केवळ दुहेरीच नाही तर दुटप्पीपणाची आहे.
एक बाब नक्की आहे की, या ukraine युद्धानंतर चीन हाच साम्यवाद्यांमधील बलिष्ठ देश म्हणून जगासमोर येईल. युक्रेनला समोर करून अमेरिकेनेच युरोपला हाताशी घेऊन निरनिराळ्याप्रकारे हे युद्ध पुढे चालू ठेवले हे सत्य आहे. दुसरे महायुद्ध १९४५ मध्ये संपले. त्यानंतर जगात अनेक लहानमोठे संघर्ष होत आले आहेत. प्रत्येक वेळी यातून तिसरे महायुद्ध तर सुरू होणार नाहीना, अशी भीती व्यक्त केली जायची. पण युक्रेनचे ukraine युद्ध या सर्वांवर कडी करणारे ठरणार आहे यात शंका नाही.
९४२२८०४४३०