---Advertisement---

‘ही दोस्ती तुटायची नाय’, अजितदादा-फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकाची चर्चा

---Advertisement---

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज (22 जुलै) एकाच दिवशी वाढदिवस आहे. राज्यातील दोन वजनदार नेत्यांना नागपुरमधून वाढदिवस आणि मित्रत्वाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ही दोस्ती तुटायची नाय असे होंर्डिंग लावून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. नागपुरच्या सेंट्रल एवेन्यूवर हा बॅनर पाहायला मिळत आहे. बॅनरवरील ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे वाक्य साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

राजकारणातील दादा’ अजित दादा आणि राजकारणातील चाणक्य देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा शुभेच्छा देणारा मजकूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने होर्डिंगवर लिहिण्यात आला आहे. यामुळे या बॅनरची चर्चा राज्यभरात रंगली आहे. दोन्ही नेत्यांकडून आज सत्ताधारी आमदारांसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पण ईरसालवाडी दुर्घटनेनंतर ही पार्टी रद्द करण्यात आली.

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे होर्डिंग्स लावले आहेत. राष्ट्रवादीतल्या बंडानंतर अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पद मिळवलं आहे. अशातच अजित पवार हे सरकारमध्ये आल्याने शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याची चर्चा आहे. पुन्हा राजकीय समीकरणं बदलून मुख्यमंत्रीपद अजित पवारांना मिळणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment