कुष्ठरोग आश्रमात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीतर्फे कपडे वाटप

धुळे  :  महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या  ३९९ वी जयंतीनिमित्त  कुष्ठरोग आश्रमात महापौर  प्रतिभा चौधरी, माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्या हस्ते कपड्यांचे  वाटप करण्यात आले. 

महिला आघाडीच्या मार्गदर्शक  कविता  कैलास चौधरी, विभागीय कार्याध्यक्ष  वैशाली नरेंद्र चौधरी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष  छाया करनकाळ,  लताबाई शेलार यांनी  कपडे  दिलेत . यावेळी महापौर  प्रतिभा चौधरी म्हणाल्या की,  समाजामध्ये संतांनी जी शिकवण दिली आहे. जे की रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले त्यामध्येच देव बघावा या शिकवणीला अनुसरुन ज्या कुष्ठरोगींना समाजाने दुर ठेवले आहे, जे समाजामध्ये दुःखी आहेत, कष्टी आहेत त्यांच्या जिवनात आनंद निर्माण कसा होईल यासाठी महिला आघाडीने जो  हा  उपक्रम घेतला.  

माजी महापौर  जयश्री अहिरराव म्हणाल्या की, महिला आघाडीने असेच चांगले उपक्रम शहरात यापूर्वी राबविले आहेत यापुढेही त्यांनी विविध उपक्रम राबवावे अश्या शुभेच्छा देते. विविध उपक्रमात आम्हांसही सामील करुन घ्यावे आम्ही सर्वातोपरी सहकार्य करु असे आश्वासीत केले.

 कुष्ठरोग आश्रमात टी शर्ट व साडी वाटप कार्यक्रम महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, जिल्हाध्यक्ष कैलास काळू चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या उपक्रमासाठी  सचिव  हेमलता चौधरी,  दिपाली तुषार चौधरी,  शोभा किशोर थोरात,  मनिषा सजन चौधरी,  अलका नटराज चौधरी,  रिटा बागुल,  संजना कल्पेश चौधरी,  वर्षा गणेश चौधरी,  सुवर्णा चौधरी,  आरती महाले, निरंजनी विनोद चौधरी,  रत्नाबाई त्र्यंबक चौधरी,  कविता कैलास चौधरी,  तृप्ती कुणाल चौधरी,  मनिषा राजेंद्र चौधरी,  प्रियंका कल्पेश चौधरी,  नलिनी रमेश करनकाळ,  सरोज विलास चौधरी,  संगीता चौधरी,  रत्ना चौधरी,  आरती किशोर बोरसे,  निशा सौरभ चौधरी,  आशाबाई महेश चौधरी,  लता राजेंद्र करनकाळ यांनी परिश्रम घेतले.