एरंडोल: जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद शुक्रवार, २९ रोजी शहरात आले असता एरंडोल न.प.च्या नावीन्यपूर्ण अशा राज्यातील पहिल्या पुस्तकांच्या बगीचाला भेट दिली. बगीचात तयार करण्यात आलेल्या विविध लेखकांच्या वाचन कट्ट्यांवर जाऊन काही वेळ त्यांनी पुस्तक वाचण्याचा आस्वाद घेतला. बगीचातील सेल्फी पॉईंट च्या ठिकाणी सेल्फी घेण्याचा आंनद, जिल्हाधिकारी यांनी घेतला. तसेच बगीचातील कवितेची भिंत, विविध भित्तिचित्रे यांची पाहणी केली.
गरपालिकेने केलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाची त्यांनी प्रशंसा केली व बगिच्यातील नोंदवही मध्ये आपला योग्य असा अभिप्राय नोंदवला. यानंतर त्यांनी एरंडोल नगरपालिकेचा पद्मालय रस्त्यावरील घनकचरा प्रकल्पावर देखील भेट दिली. नगरपलिकेमार्फत तयार होणाऱ्या खताची प्रशंसा करून, प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती व योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या. यावेळी एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे, तहसिलदार सुचिता चव्हाण तसेच नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.