जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे 21,000 पगाराच्या जॉबची संधी.. या पदांसाठी निघाली भरती

जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 01 जून 2023 आहे.

या पदांसाठी होणार भरती ?
ही भरती ”प्रयोगशाळा तंत्रज्ञ” या पदासाठी होणार आहे.
आवश्यक पात्रता : 01) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (BMLT) किंवा (BMLS) वैद्यकीय प्रयोगशाळा विज्ञान मध्ये बी.एस्सी. किंवा बी.एस्सी. सह वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (DMLT) किंवा DMLS मध्ये डिप्लोमा सह राज्य सरकार/केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त किमान 2 वर्षांचा अभ्यासक्रम 02) MS-CIT/ CDAC/ DOACC आणि संगणकाचे ज्ञान अनिवार्य आहे

वयाची अट : 21 वर्षे ते 60 वर्षापर्यंत.
वेतन : 21,000/- रुपये.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 01 जून 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : District AIDS Prevention and Control Office, 1st Floor, Behind ART Centre, Civil Hospital, Jalgaon – 425001.

जाहिरात पहा : PDF