दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : गायीच्या दूध खरेदी दरात वाढ

---Advertisement---

 

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाने २७तारखेपासून गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील पशूपालक शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांकडून आता ३५ रूपये दराने दुध खरेदी केले जाईल. दरम्यान, जळगाव जिल्हा दुध संघाचे दैनंदिन दूध संकलन सुमारे २ लाख १० हजार लिटरपर्यंत असून त्यापैकी गायीचे दूध १ लाख ६० हजार लिटर, तर म्हशीचे दूध ५० हजार लिटरपर्यंत आहे. संघाने आजपासून ३.५ फॅट (स्निग्धांग) आणि ८.५ एसएनएफ (स्निग्धेतर घटक) दर्जाच्या दूधाला प्रति लिटर ३५ रूपये खरेदी दर देण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेश चतुर्थीच्या पावन मुहुर्तावरच दूध उत्पादकांसाठी जिल्हा दूध संघाचे चेअरमन आ. मंगेश चव्हाण व संचालकांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना नवीन खरेदीदर अदा करावेत, असे प्राथमिक सहकरी दूध उत्पादक संस्थांना जिल्हा सरकारी दूध संघाकडून सूचित करण्यात आले आहे. या संदर्भात अधिकृत दरपत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. खरेदी दरातील वाढ सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करेल, असे दूध संघाने म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---