Diwali Lakshmi Pujan । हिंदू धर्मात दिवाळी सणाचं विशेष महत्त्व आहे. संपूर्ण देशात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पंचांगानुसार अश्विन कृष्ण अमावस्येला देवी लक्ष्मीची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीचं पूजन अश्विन अमावस्येला केलं जातं.
इतर दिवशी अमावस्या म्हंटलं की मन कावरंबावरं होतं. पण दिवाळीतील अमावस्येचं महत्त्व लक्ष्मीपूजनामुळे वाढते. या दिवशी देवी लक्ष्मीसोबत, धनदेवता कुबेर आणि गणपतीची पूजन करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे या दिवशी मोठ्या भक्तिभावाने घरोघरी पूजा केली जाते. पण यंदा दिवाळीच्या तिथीवरून गोंधळाचं वातावरण आहे. नेमका लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त कधी. 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर, त्यामुळे संभ्रमाचं वातावरण आहे.
दिवाळीत देवी लक्ष्मीची पूजा ही प्रदोष काळात केली जाते. अमावास्या ही 31 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजून 52 मिनिटांनी सुरु होते. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी संध्याकाळच्या पूजेनंतर आणि आधी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी…
ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दूध, दही आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू कोणालाही देऊ नयेत. दिवाळीनंतरही संध्याकाळी कधीही दूध दान करू नये. दिवाळीच्या दिवशी मीठ कुणालाही दान करू नये. ज्योतिषशास्त्रानुसार मिठाचा संबंध शुक्र आणि चंद्र ग्रहाशी आहे, त्यामुळे ते दिवाळीच्या दिवशी देऊ नये, यामुळे धनाचा ग्रह शुक्र खराब होतो. हळदीचा उपयोग शुभ कार्यात केला जातो आणि तिचा संबंध बृहस्पतिशी आहे, त्यामुळे या दिवशी हळद दान केल्याने आपल्या जीवनातील धनाचा कारक मानला जाणारा बृहस्पति खराब होतो.
साखर
दिवाळीला संध्याकाळी कोणीही साखर दान करू नये. साखर उसापासून बनते आणि लक्ष्मी देवीला ऊस प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी साखर दान करू नये.
टीप : आम्ही असा दावा करत नाही की या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.