आज विनायक चतुर्थी, करा ‘हे’ उपाय, मिळेल प्रत्येक कामात यश

तरुण भारत लाईव्ह । २३ फेब्रुवारी २०२३। फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी यावेळी २३ फेब्रुवारीला म्हणजेच आज येत आहे. आज विनायक चतुर्थीचे व्रत बरेच लोक करतात. या दिवशी श्री  गणेशाची पूजा करून व्रत इत्यादी केल्याने मनुष्याला ज्ञान आणि धन प्राप्त होते, अशी मान्यता आहे. हे व्रत कसे करावे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने विघ्न दूर करणारा बाप्पा जीवनातील सर्व अडथळे दूर करतो. असे मानले जाते की या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने भक्तांना जीवनात शुभ फळ प्राप्त होते. 23 फेब्रुवारीला पहाटे 03.24 वाजता विनायक चतुर्थीला सुरुवात होईल. गुरुवारी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11.26 ते दुपारी 01.43 पर्यंत आहे. या दिवशी गणपतीला सिंदूर तिलक लावून लाडू किंवा मोदक अर्पण करून आरती करावी.

ज्योतिशास्त्रानुसार, विनायक चतुर्थीच्या दिवशी पहाटे स्नान करावे. सुपारीचे पान घेऊन स्वच्छ पाण्याने धुवावे व कपड्याने स्वच्छ करावे. यानंतर कुंकवाच्या पानावर ‘श्री’ लिहून श्रीगणेशाला अर्पण करावे. संध्याकाळी संकटनाशक गणेश स्त्रोत पठण करून श्री गणेशाची आरती करावी. हा उपाय केल्याने घरात सुख – समृद्धी नांदते. त्याचप्रकारे कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करावी. आणि ‘प्रणाम्यं शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम्। भक्तवसं: स्मरेणित्यमायु: कामार्थसिद्धये। या मंत्राचा यथाशक्ती जप करावा.

एखाद्या व्यक्तीला मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर अशा व्यक्तींनी ‘प्रथमं वक्रतुंडच एकदंतं द्वितीयकम। तृतीयं कृष्णं पिङा्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम। या मंत्राचा यथाशक्ती एक माळ जप करावा.