दहावीनंतर करा वेब डेव्हलपर चा कोर्स; मिळेल लाखोंचा पगार

तरुण भारत लाईव्ह । ८ मे २०२३। दहावी नंतर पुढे काय करायचे हा प्रश्न विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना देखील पडतो. आता काही दिवसातच दहावीचा निकाल लागेल. हल्ली बरेच पालक मुलांनी कोणत्या क्षेत्रात करिअर करायला हवे यासाठी करिअर कॉन्सिलरची मदत घेतात.  इंटरनेटमुळे माणसाचे आयुष्य अधिक सुलभ झाले आहे. यामुळे तो हवे त्या ठिकाणी हवी तशी गोष्ट करु शकतो. जर तुमच्या मुलांला तंत्रज्ञानाचे अधिक ज्ञान असेल तर तो वेब डेव्हलपर (Web Developer)  च्या क्षेत्रात करिअर करु शकतो. हा कोर्स काय आहे  या मध्ये कुठल्याप्रकरचे शिक्षण घ्यावे लागते आणि हा कोर्स झाल्यानंतर पुढे किती पगार मिळेल हे सविस्तर सविस्तर जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

1. वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय ?
डिजिटल युगाच्या वाढत्या गोष्टींमुळे वेबसाइट्स ही आजच्या तरुणाईची गरज बनली आहे. यामुळे कामाच्या अनेक नव्या संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत. तसेच या शिक्षणाला अधिक स्कोप देखील आहे. जर तुम्हाला संगणक क्षेत्रात रस असेल तर तुम्ही वेब डेव्हलपमेंटमध्ये करिअर करू शकता. यामधून तुम्ही स्वत:चा व्यवसाय देखील करु शकतात.

वेब डेव्हलपर काय काम करतात?
वेब डेव्हलपरचे काम म्हणजे वेबसाइट तयार करणे, ती सर्व्हरशी जोडणे, त्याची देखभाल करणे. हे लोक नंतर कंटेंट पोस्टिंगचे कामही करतात.

वेब डेव्हलपरसाठी काय शिक्षण घ्यावे लागते? 

आयटीआय, डिप्लोमा, बीसीए, बीएससी-आयटी, बी- टेक, आयटी

हा कोर्स सहा महिने ते एक वर्षाचा असतो. जर तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल आणि तुमचा व्यवसाय करायचा असेल तर हे सर्वात चांगले माध्यम आहे. आयटीआय आणि डिप्लोमा हे साधारणपणे दोन वर्षांचे आणि तीन वर्षांचे अभ्यासक्रम असतात.

वेब डेव्हलपरला किती पगार मिळतो?
वेब डेव्हलपरचा सुरुवातीला पगार सुमारे 1.8 लाखांपासून सुरू होतो. जस जसा तुम्हाला कामाचा अधिक अनुभव येतो तसा त्याचा पगार वाढत जातो.