तुम्हालाही अधिक काळ मोबाईल पहाण्याची सवय आहे? मग ही बातमी वाचाच

तरुण भारत लाईव्ह । २१ मे २०२३। मोबाईल हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. जवळपास प्रत्येक काम हि मोबाईल मधून होतात. मात्र तुम्हाला माहितीये का? मोबाईल सतत बघितल्याने त्याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम पडतो? मोबाइल फोन बघण्याचीही मर्यादा असावी. अधिक काळ मोबाइल बघितल्याने त्याचे काय दुष्परिणाम होतील हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

जे लोक ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाइल फोन वापरतात त्यांना ब्लड प्रेशरचा धोका फार जास्त असतो. तसेच डॉक्टरांच्या मते मोबाइलमधून निघणारी रेडियो फ्रिक्वेंसी हाय ब्लड प्रेशरचे सगळ्यात मोठे कारण आहे.

सतत मोबाईल वापरल्याने त्याचा तुमच्या डोळ्यावर परिणाम होतो. तुम्हाला जाणवत नसले तरी मोबाईलची नीळी स्क्रीन तुमच्या डोळ्यांना डॅमेज करू शकते. कुठल्याही गोष्टी अतिवापरणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तुम्ही सतत मोबाईल वापरल्यामुळे तुमच्या हाताला दुखणे जाणवू शकते. उत्तम आरोग्यासाठी झोप फार महत्वाची आहे. उशीरा रात्रीपर्यंत मोबाइल चाळल्याने झोप येत नाही.

मोबाइल फोनमुळेसुद्धा तुम्हाला तणाव येई शकतो. तुम्ही मोबाइलवर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर आणि पोर्टल्सवर काहीतरी बघत असता किंवा वाचत असता यामुळे तुमची स्ट्रेस लेव्हल वाढू शकते.