तुमच्याकडेही आहेत का स्मार्ट फोन, ही काळजी घेतात का?, जाणून घ्या शास्त्रज्ञ काय सांगताय

Mobile usage : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आज लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत म्हणजे, प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे.  अशात आता अमेरिकेच्या डॉ. मामिना तुरेगैनो यांनी आपल्या अहवालात फोनच्या वापराविषयी चिंताजनक माहिती समोर आणली आहे. डॉ. मामिना या त्वचा रोग तज्ञ आहेत. त्यांनी आपल्या संशोधनातून मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आणली आहे.

काय आहे ती धक्कादायक माहिती?
डॉ. मामिना यांनी आपल्या अहवालात असं म्हटलं आहे की, फोनच्या अती वापराने आणि तुम्ही तो कशा प्रकारे वापरता याने तुमच्या आरेग्यावर परिणाम होऊ शकतो. टीकटॉकवरती त्यांनी स्वत:चा एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती सर्वांना दिली आहे.

सार्वजनिक शौचालयापेक्षाही फोनवर घातक जंतू
फोनवर सतत बॅक्टीरीया विविध प्रकारचे जंतू फिरत असतात. हे जंतू आपल्या त्वचेसाठी फार घातक असतात. एवढेच नाही तर आपल्या अहवालात त्यांनी पुढे म्हटलं की, हे जंतू एखाद्या सार्वजनिक शौचालयात असतात त्यापेक्षाही कितीतरी पटीने घातक असतात. जेव्हा आपल्याला कोणत्यातरी व्यक्तीचा कॉल येतो आणि ती व्यक्ती फोन उचलून थेट कानाला लावते. त्यावेळी फोनवर असलेले सर्व  आपल्या त्वचेला स्पर्श करतात. त्वचेतून आपल्या शरिरात जातात. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्यासाख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

उपाय काय?
अशा प्रकारच्या जंतूपासून आपला बचाव व्हावा यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी हे देखील डॉ. मामिना यांनी सांगितले आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, अशा समस्यांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी फोन सतत स्वच्छ करा. साध्या पाण्यात अथवा साबणाच्या पाण्यात तुम्ही एखादा रुमाल भिजवून त्याने आपला फोन स्वच्छ ठोवावा.