तुम्हाला पण जास्तवेळ रील्स पहायची सवय आहे? मग ही बातमी वाचाच

तरुण भारत लाईव्ह । २५ मे २०२३। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स पाहण्यात वेळ घालवतात. हे काही सेकंदाचे व्हिडीओ इतके मनोरंजन करणारे असतात की, संपूर्ण वेळ स्क्रोल करत राहतात. यामुळेच लोक मानसिक आजाराला बळी पडत आहेत. पण या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.

इन्स्टाग्रामचे रील्स पाहाणे याची इतकी सवय लोकांना लागली आहे की, त्याचा सरळ परिणाम हा शरीरावर होतो. यामुळेच ज्या लोकांना फोनची जास्त आवड आहे त्यांना झोप न लागणे, डोकेदुखी, मायग्रेन सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यासोबतच मानसिक आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. ज्यामुळे डिप्रेशनमध्ये जाण्याचाही धोका वाढला आहे.

डोळे आणि डोके दुखणे. झोपेच्या वेळी डोळ्यात लाईट येतेय असे वाटणे. खाणे-पिणे वेळेवर न करणे. जर तुम्हाला हा आजार टाळायचा असेल तर दररोज कमी रिल्स पाहण्याचा प्रयत्न करा. गरज असेल तेव्हाच मोबाईल वापरा. पुस्तके वाचायला सुरुवात करा. मित्र आणि कुटुंबासह अधिक वेळ घालवा.