तरुण भारत लाईव्ह । मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात नेमका निकाल कधी लागणार आहे, याची जोरदार चर्चा सुरू असताना अखेर दि. ११ मे रोजी निकाल जाहीर झाला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे म्हणाले मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला . पंरतू जेव्हा ठाकरेंनी भाजपसोबत सत्तेत आले तेव्हा ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार बनवलं त्यामुळे तेव्हा नैतिकता कुठे होती? , असा सवाल फडणवीसांनी केला आहे.
तसेच तुम्ही खुर्चीसाठी विचार सोडला तर शिंदेंनी विचारासाठी खुर्ची सोडली. त्यामुळे ठाकरेंना नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार नाही. राजीनाम्याला नैतिकतेचा मुलामा देऊ नका. शिंदेंच्या नियुक्तीवर आज सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण शिक्कामोर्तब केलेले आहे, असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंचा समाचार घेतला.