---Advertisement---

Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिला ठार, बेटावदमधील घटना

---Advertisement---

बेटावद (शिंदखेडा): गावात मोकाट कुत्र्यांचा दहशत आणखी वाढली असून, रविवारी (1 जून) सकाळी चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेला पिसाळलेल्या कुत्र्यांनी हल्ला करीत ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या आठवडाभरात ही दुसरी प्राणघातक घटना असून, यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. अरुणाबाई बालू भिल (वय 50) असे महिलेचे नाव आहे.

सध्या गावात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून, रविवारी (1 जून) सकाळी साडेआठच्या सुमारास अरुणबाई बालू भिल या गावालगतच्या शिवारात चारा आणण्यासाठी गेल्या असताना सहा ते सात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. मात्र, तोपर्यंत त्या गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाल्या. घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून, संतप्त ग्रामस्थांनी त्यांचा मृतदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन जोरदार निषेध केला. ‌‘आमच्या जीवाचे मोल नाही का?’ असा सवाल उपस्थित करीत ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आठवड्यातील दुसरी मृत्यूची घटना

आठवडाभरापूर्वीच 10 वर्षांच्या मुलाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात बळी गेला होता. तेव्हापासून प्रशासनाला अनेक वेळा विनंती करूनही मोकाट कुत्र्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.

प्रशासनाची ढिसाळ भूमिका

बेटावद ग्रामपंचायतीने धुळे जिल्हा परिषद व शिरपूर पंचायत समितीकडे यापूर्वी अनेक वेळा लेखी अर्ज करूनही कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही कार्यवाही झाली नाही. काही वेळा कुत्र्यांना पकडण्यासाठी पथक पाठवले गेले होते. मात्र, त्यानंतर कोणतीही सातत्यपूर्ण कारवाई झाली नाही.

ग्रामस्थांच्या मागण्या

मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा. पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई आणि सरकारी मदत मिळावी. ग्रामपंचायतीने पशुवैद्यकीय विभागाच्या सहकार्याने कुत्र्यांची निर्बिजीकरण मोहीम तातडीने राबवावी. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ठोस उपाययोजना कराव्यात.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. लवकरात लवकर पथक पाठवून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येईल.

प्रमोद खलाणे (ग्रामसेवक)

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment