Crime : डोंबिवली येथे सोमवारी रात्री बिबट्याची कातडी विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना रामनगर पोलिसांनी अटक केली. दोघेही आरोपी नंदुरबार आणि धुळे येथून आल्याची माहिती आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.
डोंबिवली पूर्वेकडील ९० फूट रस्त्याजवळ सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास दोघे जण बिबट्याचे कातडे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे राम नगर पोलिसांनी ९० फूट रस्त्याजवळ सापळा रचला. रात्री उशिरा दोघे जण याठिकाणी आले. पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. पोलिसांनी दोघांनाही हटकले आणि त्यांची चौकशी केली. तर त्यांनी पोलिसांना उडवा उडवीची उत्तरं दिली. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशय आणखी बळावला.
पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे बिबट्याचे कातडे सापडले. राम नगर पोलिसांनी तात्काळ या दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे असलेले बिबट्याचे कातडे हस्तगत केले. हे दोघेही जण बिबट्याचे कातडे विकण्यासाठी डोंबिवलीत आले होते.
जयंतीलाल साळी आणि दिनेश जावरे अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघेही नंदुरबा आणि धुळे या ठिकाणावरुन आले होते. हे दोघं बिबट्याचे कातडे कोणाला विकण्यासाठी आले होते आणि त्यांच्याकडे ते आले कुठून याचा शोध घेत आहेत. या दोघांची देखील पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. तसंच याप्रकरणाता तपास देखील पोलिस करत आहेत.