Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. कॅपिटल हिंसाचार प्रकरणात दोषी मानत कोर्टाने त्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी अपात्र घोषित केलं आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवता येणार नाही. याशिवाय निवडणुकीत मतदान देखील करता येणार नाही.अमेरिकेच्या कोलोरॅडो हायकोर्टाने मंगळवारी हा निर्णय दिला आहे.
अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी अपात्र घोषित करण्यात आलं आहे. इतकंच नाही, तर कोर्टाने व्हाईट हाऊसच्या निवडणूक शर्यतीतील प्राथमिक अध्यक्षीय मतपत्रिकेतून ट्रम्प यांचं नाव काढून टाकले आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच १४ व्या घटनादुरुस्तीच्या कलम ३ चा वापर राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला अपात्र ठरवण्यासाठी केला गेला आहे.
काय आहे प्रकरण?
६ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दारून पराभव झाला होता. डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांनी ट्रम्प यांना तब्बल ७० लाखांहून अधिक इलेट्रोल मतांनी हरवलं होतं. मात्र, निवडणुकीत घोटाळा झाला, असं म्हणत ट्रम्प यांनी आपला पराभव नाकारला.
याविरोधात त्यांनी अमेरिकेतल्या कोर्टातही धाव घेतली. पण, कोर्टानंही त्यांना फटकारलं आणि ही निवडणूक योग्य असून जो बायडन विजेते असल्याचं सांगितलं. एवढं होऊनही ट्रम्प यांनी पराभव मान्य केला नाही. आणि ट्विटरवरुन सतत आपली मतं मांडत राहिले.
परिणामी ट्रम्प समर्थक आक्रमक झाले. त्यांनी अमेरिकेच्या कॅपिटल भवनाबाहेर गर्दी करत घोषणाबाजी केली. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. यावेळी झालेल्या हिंसाचारात ४ ते ५ जणांचा मृत्यू झाला. तर याशिवाय अनेकजण जखमी झाले.
दरम्यान,आंदोलकांना चिथावणी देण्याचा ठपका ठेवत ट्रंप यांच्यावर महाभियोगाचा खटला दाखल करण्यात आला होता. मात्र, ट्रम्प यांच्या विरोधात दोन तृतीयांश मते न पडल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. आता कोलोरॅडो हायकोर्टाने याप्रकरणात त्यांना दोषी मानत निवडणूक लढवण्यावर बंदी घातली आहे.