Ram Mandir : अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिराच्या पहिल्या देणगीदाराला रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील रहिवासी असलेल्या सियाराम यांनी न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच श्री राम जन्मभूमी मंदिरासाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली होती. सियाराम गुप्ता यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये श्री राम मंदिराच्या बांधकामासाठी एक कोटी दिले होते.
एक कोटी रक्कम निधी उभारण्यासाठी त्यांनी आपली १६ एकर जमीन विकली होती. जमीन विकून सुद्धा एक कोटींची रक्कम गोळा झाली नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या नातेवाईकांकडून १५ लाख रुपये उसने घेतले. त्यांनी २० नोव्हेंबर २०१८ रोजी एक कोटी रुपये दान केले होते.
२२ जानेवारी २०२३ रोजी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी सियाराम गुप्ता यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील ६,००० पेक्षा अधिक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.