फळे खायला आवडत नाही? मग ट्राय करा फ्रुट सॅलड

तरुण भारत  लाईव्ह ।२१ जानेवारी २०२३। फळे खाण आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असत. फळांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शिअम असे अनेक गुण असतात. पण काहीवेळा नुसती फळे खायला आपल्याला आवडत नाही. मग अशावेळी फळापासून बनवलेले काही पदार्थ बनवले तर ते लहान मुलांना सुद्धा आवडतील. चला तर मग फळांपासून बनणारे फ्रूट सॅलड घरी कसे बनवतात हे जाणून घ्या तरुण भारत च्या माध्यमातून.

साहित्य 

दूध, व्हॅनिला कस्टर्ड पावडर, साखर, सफरचंद, मोसंबी, द्राक्षे, डाळिंब, चिकू, केळी, आवक्श्यक्तेनूसार सुकामेवा.

कृती 

सर्वप्रथम दूध उकळून घ्यावे. नंतर त्यामध्ये साखर घालून नीट ढवळून घ्यावे. कस्टर्ड पावडर एका कपात घेऊन थोडं थंड दूध घालून त्याची एकजीव पेस्ट करा. दुधामध्ये हे कस्टर्ड पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्या. तयार कस्टर्ड थंड करा आणि नंतर फ्रीजमध्ये थंड करायला  ठेवा. थंड झाल्यावर आंब्याच्या बारीक फोडी करून त्यामध्ये घाला, त्याचप्रमाणे सफरचंद, द्राक्षे, चिक्कू, केळी याच्या छोट्या फोडी कराव्यात आणि डाळींबाचे दाणे त्यात घालून मिश्रण एकजीव करावे. आणि आवडीनुसार सुकामेव्याचे बारीक तुकडे करून फ्रुट सॅलड वर घाला. आणि सर्व्ह करा फ्रुट सॅलड.