तरुण भारत लाईव्ह ।०७ फेब्रुवारी २०२३। आपण प्रत्येक जण स्मार्टफोन वापरतो मग त्याच स्मार्टफोन ला गरज असते सेफ्टी ची त्यासाठी आपण स्मार्टफोन ला पासवर्ड लावतो. पण काही वेळेला काय होत कि आपण पासवर्ड विसरून जातो. तुम्हाला जर पासवर्ड लक्षात ठेवणं कठीण जात असेल तर या काही टिप्स वापरून तुम्ही पासवर्ड लक्षात ठेवू शकता.
पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही गुगल ची मदत घेऊ शकता. पासवर्ड मॅनेजर तुमचे सर्व पासवर्ड ट्रॅक करतात. स्मार्टफोन असल्यास आणि लिंक केलेले Google Account असल्यास, तुम्ही Google चे पासवर्ड मॅनेजर वापरू शकता. जर तुम्ही स्मार्टफोन मध्ये पासवर्ड सेवा असतील तर तुम्ही हे अशाप्रकारे शोधू शकता पहिले तुमच्या Android फोनवर Google Chrome ब्राउझर सुरू करा आणि वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. नंतर पॉप-अप मेनूमधील सेटिंग्ज वर टॅप करा. आता तुम्हाला पुढील मेनूमध्ये पासवर्डवर टॅप करावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा पासवर्ड किंवा फेस किंवा टच स्कॅन टाकावा लागेल. आता तुमच्यासमोर वेबसाइट्सची एक लांबलचक यादी दिसेल, ज्यामध्ये युजरनेम किंवा पासवर्ड सेव्ह केला जाईल.
स्मार्टफोन मध्ये सेव असलेले पासवर्ड तुम्ही केव्हाही पाहू शकता. यासाठी तुम्हाला सेटिंग मध्ये जाऊन पासवर्ड च्या ऑप्शन मध्ये जाऊन क्लिक करावे लागेल तेव्हा तुम्हाला तुम्ही सेव केलेले पासवर्ड सहज दिसू शकतात.