चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ, पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तरुण भारत लाईव्ह ।१६ फेब्रुवारी २०२३। सुरत जिल्ह्यातील गंगाधरा येथील माहेर व धरणगाव तालुक्यातील पिंपळे बुद्रूूक येथील विवाहितेने माहेरून एक लाख रुपये न आणल्याने तसेच तिच्या चारित्र्यावर संशय असल्याने सासरच्या मंडळींनी मारहाण करीत छळ केला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल

याबाबत योगिता अशोक पाटील (२८, गंगाधरा, ता.बारडोली, जि. सुरत, ह.मु.पिंपळे बुद्रूक, पोस्ट-साकरे, ता.धरणगाव) यांच्या ङ्गिर्यादीनुसार, सासरच्या मंडळींनी माहेरून घर गहाण ठेवण्यासाठी एक लाख आणावेत म्हणून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करीत गांजपाठ केला. तसेच चारित्र्यावर संशय घेत पती अशोक पाटील यांनी माहेरी घरी येऊन घर गहाण ठेवण्यासाठी एक लाखाची मागणी केली. तसेच अश्लील शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन फारकतीची मागणी केली.
विवाहितेच्या तक्रारीवरून पती अशोक विश्वास पाटील, सासू सुशीलाबाई विश्वास पाटील (रा.पथराड, ता.धरणगाव), नणंद उज्वला अर्जुन पाटील, नंदोई अर्जुन गंगाराम पाटील (गंगाधरा, ता.बारडोली), नणंद सपना धीरज पाटील, नंदोई धीरज कैलास पाटील (रा.जतपूर, बडोदा, गुजरात) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय करीम सयैद करीत आहेत.