तरुण भारत लाईव्ह न्यूज : आजच्या काळात पॅनकार्ड आणि आधारकार्ड या दोन गोष्टी आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बँकेसारख्याच इतर अनेक कामांमध्ये आपल्याला पॅनकार्डची वारंवार गरज भासत असते. परंतू, हेच पॅनकार्ड कुठे हरवले तर? आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. आधारकार्डप्रमाणेच आता पॅनकार्डदेखील ऑनलाईन डाउनलोड करता येणे शक्य आहे.
पॅनकार्ड हरवल्यास ई पॅन डाउनलोड करावयाची प्रक्रिया –
१. सर्वप्रथम आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा https://www.incometax.gov.in/
२. येथे ‘इन्स्टंट ई पॅन’ पर्याय निवडा
३. ‘न्यू ई पॅन’ पर्याय निवडा
४. तिथे मागितलेली माहिती भरा
५. Accept पर्यायावर क्लिक करा
६. तुमच्या नोंदणीकृत नंबरवर ओटीपी येईल, तो टाइप करून ‘पुष्टी करा’.
७. तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पॅन कार्डची डिजिटल प्रत PDF स्वरूपात येईल. ५ मिनिटांत डाउनलोड करा ई पॅन.