तरुण भारत लाईव्ह ।१३ फेब्रुवारी २०२३। विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक विभागात इ तिसरी च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी परिसर अभ्यास या विषयातील “माझी शाळा”या घटकाचे अध्ययन सोपे होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उपक्रमातून शालेय इमारतीच्या उद्घाटन चा वर्धापन दिवस साजरा केला. कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका योगिता शिंपी तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या फलकाचे अनावरण मुख्याध्यापिका योगिता शिंपी ,पूनम दहीभाते व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची संपूर्ण सजावट विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पताका व विविध वस्तूंच्या साह्याने विद्यार्थ्यांनी स्वतः केली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय गजानन कोळी यांनी करून दिला. वंदना सावदेकर यांनी शाळेच्या वाटचाली विषयी थोडक्यात माहिती सांगितली.
इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी ‘या देशाची आम्ही लेकरे’ हे गीत सादर केले. छोटू पाटील यांनी अनुभव कथन केले. याप्रसंगी योगिता शिंपी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता तिसरीतील शिवांशू चौधरी व सई मुळे यांनी तर आभार गौरव पाटील याने केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रतिभा चौधरी, गजानन कोळी, छोटू पाटील व वंदना सावदेकर यांनी केले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांचे मार्गदर्शन लाभले.