डॉ. अविनाश आचार्य विद्यालयातील ज्ञानदीप लावणारे दीपपूजन

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, डॉ. अविनाश आचार्य विद्यालय पूर्व प्राथमिक विभागात आज १७ जुलैला दीप अमावस्या ज्योतिर्मयरित्या साजरी झाली. यात पुरातन काळी असलेल्या दगडी दिव्यांपासून ते आत्तापर्यंतच्या आधुनिक दिव्यांपर्यंतचे सर्व प्रकारचे विविध दिवे प्रत्यक्ष लावून दाखवून ते कोणत्या प्रसंगी व कशासाठी कोणते दिवे लावतात? हे त्या दिव्यांचा परिचय करून देऊन सोप्या भाषेत सांगितले. तसेच अग्नि कसा निर्माण झाला? हे गोष्टी रूपात सांगितले.

आपल्या संस्कृतीची, परंपरांची, सणांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी या हेतूने डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शाळेत अनेक वर्षांपासून दीप अमावस्येला दीपपूजनाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा केला जात आहे. संस्कृतीचा वारसा जतन करणे हा निर्मळ हेतू आहेच. त्याचबरोबर विविध प्रकाशस्रोतांचा मुलांना परिचय व्हावा, त्यांचे महत्त्व व उपयोग जाणून घेता यावेत, याकरिता पारंपरिक दगडी दिव्यांपासून ते अगदी सौरऊर्जेवर चालणाऱ्या विविध दिव्यांची आरास या दिवशी आकर्षकरीत्या विद्यालयात मांडली जाते.

या बरोबरच आता आपल्याला एका बटनावर उपलब्ध असलेली वीज ही पाणी, कोळसा, वारा (पवनचक्की) व ओला कचरा (बायोगॅस) यापासून बनते. तेव्हा आपण पाणी वाचवायला हवे, झाडे लावायला हवी, ओला- सुका कचरा हा वेगवेगळ्या डस्टबिनमध्येच टाकावा ही मूल्य रुजवली. तर अशा प्रकारे मिळणारी ही अनमोल वीज आपण वाचवली पाहिजे हा संकल्प करण्यात आला.

कार्यक्रमाची सर्व सूत्रे कार्यक्रम प्रमुख नमिता दत्तरी यांनी पाहत असताना,आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण विद्यार्थी म्हणून कुठल्या कृती करू शकतो हे देखील सांगितले. दिव्यांची सुबक मांडणी करून दाखवण्याचे काम पल्लवी कुलकर्णी व मोनाली देसाई यांनी पाहिले. प्रत्येक दिव्याचे वर्णन करणारे गीत रोहिणी कुलकर्णी यांनी सादर केले. विभाग प्रमुख कल्पना बावस्कर यांचे कार्यक्रमासाठी मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.