नंदुरबार : चौफेर विकास कामांमुळेच आमच्या विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं असून ते प्रचारासाठी खोट्या गोष्टींचा आधार घेऊ लागले आहेत. परंतु गावित परिवारात सगळेच डॉक्टर असून आम्हाला त्या पोट दुखीवरचे इलाज माहिती आहेत; असा टोला डॉ.हिना गावित यांनी विरोधकांना लगावला.
मूलभूत सुविधा देण्यासाठी आणि गावागावातील विकास कामे करण्यासाठी मागील दहा वर्षात आपल्यापर्यंत भाजपाच्या विरोधात आणि गावित परिवाराच्या विरोधात बोलणाऱ्यांपैकी कधी कोणी आले होते का? याचा विचार करूनच दिनांक 13 मे 2024 रोजी मतदान करावे, असेही जाहीर आवाहनही त्यांनी केले.
लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार खा. डॉ. हिना गावित यांनी साक्री तालुक्यातील काकशेवाड, कुडाशी, वार्सा, शेंदवड, मांजरी, चावडीपाडा, मोहगांव, बारीपाडा ,बोफखेल, शिव, विजयपुर, डांगशिरवाडे, दरेगांव, हारपाडा, म्हायचा पाडा, सुकापुर, बल्हाणे, शेवगे, कोकणगांव, धामुंदर, विरखेल, सितारामपुर, मंडाणे, पारगांव, धोंगडे, शेलबारी यांसह लहान मोठ्या गावात प्रचार फेरी काढून मतदारांशी संपर्क केला.
भर उन्हात गाव अन गाव पिंजून काढले. त्या दरम्यान पार पडलेल्या कॉर्नर सभांमधून त्यांनी हे आवाहन केले. उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या समवेत अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी या प्रचार फेरीचे नेतृत्व केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य खंडू आप्पा कुवर, जिल्हा परिषद सदस्य सुनेत्रा साहेबराव गांगुर्डे, पंचायत समिती सदस्य मनोज जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष तुळशीराम गावित, भाजप जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत सुरेश पाटील, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत घरटे, मंडळ अध्यक्ष विकी कोकणी, सरचिटणीस सुरेश शेवाळे, योगेश भामरे, शहराध्यक्ष राकेश साहेबराव, प्रवीण राऊत, सचिन शेवाळे, सचिन देसले, संजय अहिरराव, तुषार घरटे यांच्यासह त्या भागातील विविध गावाचे सरपंच उपसरपंच कार्यकर्ते आणि महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उ