---Advertisement---

डॉ. हिना गावितांच्या पाठपुराव्याला यश; नंदुरबार रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट

---Advertisement---

नंदुरबार : अमृत भारत रेल्वे स्थानकांतर्गत नंदुरबार रेल्वे स्थानकाचा विस्तार करून कायापालट करण्यासाठी अधिकृतरीत्या १५ कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. खासदार असताना संसदरत्न डॉ. हिना गावित यांनी सातत्याने या कामांचा पाठपुरावा केला होता. त्या प्रयत्नांमुळेच हा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याकडून देण्यात आली.

नंदुरबार रेल्वे स्थानक हे सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील हे महत्त्वाचे स्थानक असल्याने या स्थानकाचा दर्जा वाढवावा आणि अधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. खासदार असताना डॉ हिना विजयकुमार गावित यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. त्या नंतर अमृत भारत स्थानकांतर्गत नंदुरबार स्थानकाचा समावेश करण्यात आला होता. कालांतराने तांत्रिक व शासकीय मान्यता प्राप्त होण्याच्या प्रक्रिया पार पडल्या असल्या तरी निधी प्राप्त झालेला नव्हता. आता तो प्रमुख अडथळा दूर झाला आहे. यावर माजी खासदार डॉ. हिना विजयकुमार गावित यांनी नंदुरबार रेल्वे स्थानकाचा कायापालट होण्याला गती मिळेल अशी अपेक्षा करूया असे म्हटले आहे.

या अंतर्गत स्थानकात लिफ्ट्स, सरकता जिना अर्थात एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच स्थानकांचे सौंदर्गीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे. दुसऱ्या बाजूला प्रवेशद्वार, नवीन तिकीट खिडकी, पश्चिमेकडील पादचारी पुलाची लांबी वाढवणे या पायाभूत सुविधांसह वेटिंग लाऊंज अर्थात प्रतीक्षालय, खाद्यपदार्थ विक्रीचे फूड पार्कस् उभारले जातील.

नंदुरबार स्थानकावर दिवसेंदिवस या स्थानकातील वर्दळ वाढू लागली आहे. त्यासाठी फलाटांची संख्या वाढवणे आवश्यक असल्याने चौथा फलाट तयार करण्यात येणार आहे. याशिवाय अत्याधुनिक २ स्वच्छतागृहे, पिण्याचे शुद्ध पाणी वगैरे सोयी सुविधा केल्या जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment