महाराष्ट्र भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.केतकी पाटील

जळगाव : गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.केतकी पाटील यांची महाराष्ट्र भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी कन्या डॉ. केतकी पाटील आणि पाचशेपेक्षा अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आज २४ रोजी दुपारी २ वाजता मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते. त्यानंतर पक्षाने डॉ. केतकी पाटील यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.