Dr. Mithali Sethi : डॉ. मिताली सेठी नंदुरबारच्या नव्या जिल्हाधिकारी

नंदुरबार : येथील जिल्हाधिकारीपदी डॉ. मिताली सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश राज्य शासनाने आज सोमवारी काढले असून, लवकरच त्या आपल्या पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत.

डॉ. सेठी या २०१७ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या आतापर्यंत पाच पोस्टींग झाल्या आहेत. जुलै २०१८ ते एप्रिल २०१९ या काळात त्या अमरावती येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर जुलै २०१९ ते ऑक्टोबर २०१९ या काळात दिल्ली येथे केंद्र सरकारचे असिस्टंट सेक्रेटरी म्हणून काम पाहिले आहे.

त्यानंतर ऑक्टोबर २०१९ ते जुलै २०२१ या काळात त्या धारणी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, उपाविभागीय मॅजिस्ट्रेट, प्रकल्प अधिकारी या पदांवर कार्यरत होत्या. जुलै २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या काळात चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.

त्यानंतर जानेवारी २०२३ पासून त्या वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर येथील संचालकपदी कार्यरत होत्या. तत्पुर्वी त्यांनी मे २००९ ते जून २०१२ या काळात तामिळनाडू येथील शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात सीनीयर रेसीडेंट म्हणून सेवा केली आहे. ऑगस्ट २०१२ ते फेब्रुवारी २०१५ या काळात त्या चेन्नई येथील एसआरएम डेंटल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होत्या.

फेब्रुवारी २०१५ ते ऑगस्ट २०१७ या काळात पॉंडेचेरी इन्स्टीटयूट ऑफ मेडीकल सायन्सेस येथे असिस्टंट प्रोफेेसर म्हणून कार्यरत होत्या.