Dr. Mohan Bhagwat : बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार; त्यांना पाहणं हे कुणाची जबाबदारी, काय म्हणाले सरसंघचालक ?

नागपूर : आज देशाचा ७८ वा स्वतंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरूवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर त्यांनी स्वयंसेवकांना संबोधित केले.

बांगलादेशातील परिस्थितीवर भाष्य
बांगलादेशातील हिंदू बांधवांना त्रास होऊ नये, हे पाहणं एक देश म्हणून आपली आणि सरकारची जबाबदारी आहे. सरकार हे करेलच, मात्र त्यासाठी देशाच्या नागरिकांचा पाठिंबा ही आवश्यक आहे, असं डॉ. मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

बांगलादेशात उत्पात होत आहे. तेथील हिंदू बांधवांना त्याचा त्रास होत आहे. भारताने कधी कोणावर आक्रमण केले नाही, संकटात असलेल्यांना कायमच मदत केली. तो देश आपल्याशी कसं वागला हे भारताने पाहिले नाही, गरजेच्या काळात भारताने कायमच मदत केली.

अराजकता असलेल्या देशांमध्ये असलेल्या हिंदू बांधवांना त्रास होऊ नये, हे पाहणं एक देश म्हणून आपली आणि सरकारची जबाबदारी आहे. सरकार मदत करेलच, मात्र, त्यासाठी देशाच्या नागरिकांचा पाठिंबा ही आवश्यक आहे, अंसही त्यांंनी यावेळी म्हटलं आहे.