---Advertisement---

Nandurbar News : निष्क्रीय कार्यकर्त्यांच्या नावापुढे आताच फूली मारा, डॉ. मोरे नेमकं काय म्हणाले?

---Advertisement---

नंदुरबार : राजकारण हा विषय जबरदस्तीचा नाही, ज्याला राजकारणाची आवड आहे, असेच कार्यकर्ते पक्षात टिकून राहतात. जो मनापासून पक्षाचे काम करेल अशाच सदस्यांना कार्यकारीणीत घ्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेत स्वयंस्फूर्तीने काम केली पाहिजेत. पदाधिकाऱ्यांनी दर महिन्याला एक आढावा बैठक घेणे आवश्य़क आहे. निष्क्रीय कार्यकर्त्यांच्या नावापुढे आताच फूली मारा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक मदर टेरेसा हायस्कूलच्या सभागृहात पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे हे अध्यक्षस्थानी होते. युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, ज्येष्ठ़ पदाधिकारी माधवराव पाटील,सरचिटणीस मधूकर पाटील, मोहन शेवाळे, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र नगराळे आदी मान्य़वर व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. अभिजित मोरे म्हणाले की, सेलच्या अध्यक्षांनी तात्काळ कार्यकारीणी गठीत करावी, तसेच सदस्य़ नोंदणी करुन ती सादर करावी. पक्षाकडून लवकरच मंगल कलश यात्रेचे आयोजन करण्यात येणार असून, मुक्ताईनगरपासून ही यात्रा सुरु होईल. याची तारीख कळविण्यात येईल,अशी माहिती या वेळी देण्यात आली. कार्यकारिणीत सर्व जाती धर्माच्या सदस्यांना सामावून घेण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले.

नरेंद्र नगराळे, मोहन माळी व सिताराम पावरा यांनी मनोगत व्यक्त़ केले. शहादा तालुका अध्यक्ष सुरेंद्र कुवर, महिला जिल्हाध्यक्ष सिमा सोनगरे,संगीता पाडवी, छोटू कुंवर, प्रकाश भोई,राजेंद्र बाविस्क़र,डॉ नितीन पवार,गणेश राजे यांनी चर्चेत सहभाग घेतला.उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे तसेच नेते अनिल पाटील हया सर्व नेत्यांना ग्राऊंड लेव्ह़लवर काम करणारे कार्यकर्ते आवडतात. पक्ष संघटन मजबूत करण्यावर सर्वांनी परीश्रम घ्यावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मुंबई येथे एक मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमात नंदुरबारची खादय संस्कृती. लोक कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. तेव्हा या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. मोरे यांनी केले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment