डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम ; 7 ट्रॅक्टर निर्माल्य केले संकलित

---Advertisement---

 

भुसावळ : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत अनंत चतुर्दशीनिमित्त तापी नदीकाठी निर्माल्य संकलन उपक्रम राबवण्यात आला. सालाबाद प्रमाणे शनिवारी 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने तापी नदीकाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या मार्फत डॉ. सचिन दादा धर्माधिकारी व पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये निर्माल्य संकलन उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमात भुसावळ शहरातील तापी नदीवरील पुलाच्या चारही बाजूंना भुसावळ व यावल तालुक्यातील 467 सदस्याद्वारे 7 हजार 666 घरगुती गणेश मंडळांचे निर्माल्य संकलन करण्यात आले. या उपक्रमात एकूण 7 ट्रॅक्टर निर्माल्याचे संकलन करण्यात आले.
या निर्माल्याचे लागलीच सदस्यांद्वारे विलगीकरण करून त्यातील 30 टन निर्माल्याचे वृक्षांना खत निर्मिती करण्यासाठी समर्थ बैठक अट्रावल येथे पाठवण्यात आले. उरलेल्या निर्मल्याचे स्थानिक प्रशासनाच्या नियमांप्रमाणे विल्हेवाट करण्यात आली.

स्थानिक नागरिकांनी देखील विश्वासाने आपल्या जवळील निर्माल्य श्री सदस्यांकडे देत उपक्रमास सहकार्य केले. त्याचप्रमाणे बऱ्याच नागरिकांनी स्वतःहून यापुढे निर्माल्य प्लास्टिक बॅगमध्ये संकलित करणार नाही असा स्वैच्छिक संकल्प केला. उपस्थित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा मार्फत करण्यात आलेल्या या उपक्रमाची प्रशंसा केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---