नंदुरबार : अजेंडा न मिळाल्याचा कांगावा करून सभा थांबवू पाहणाऱ्या विरोधकांना रस्ते, पाणी, आरोग्य समस्यांचा विसर कसा पडला? विकास कामे थांबवण्यासाठीच विरोधकांनी गोंधळ घातला ; परंतु आम्ही ते मनसुबे उधळून लावत सर्व 34 विषय आज बहुमताने मंजूर केले, अशी माहिती जि.प. अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी दिली.
नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज दिनांक पाच ऑगस्ट 2024 रोजी दुपारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव बारगळल्या नंतरची ही पहिली सभा होती. एकूण 34 विषय अजेंड्यावर होते.
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अजेंडा वेळेवर मिळालेला नाही असे सांगून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आमचे माइक बंद केले असा आरोपही केला. याला अनुषंगवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या, सभागृहात आपले संख्या बळ कमी असल्याचे लक्षात आल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्याचा पवित्र घेतला. अजेंडा त्यांना वेळेवर घरपोच देण्यात आला होता. याच्यापूर्वीसुद्धा त्यांनी अजेंडा मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या म्हणून टपालाने पाठवण्यात आला टपाल आणि पाठवलेला मिळाला नाही असं सांगू लागले म्हणून पंधरा दिवस आधीच व्यक्तीच्या हस्ते त्यांच्या घरी पोहोचता केला गेला.
तरीही अजेंडा मिळाला नसल्याचा कांगावा त्यांनी आज केला. वास्तविक सतत चालू असलेल्या पावसामुळे एकीकडे दरड पडून रस्ते बंद पडत आहेत, दुर्गम भागात आरोग्य समस्या उद्भवत आहेत त्याचबरोबर अनेक ठिकाणी पाणी आणि रस्त्यांचा प्रश्न उद्भवला आहे. त्याच्याशी संबंधित चर्चा घडणे अपेक्षित होते. अजेंड्यावर लोकांच्या हिताच्या विकास कामांशी संबंधित विषय असताना सभा थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांना विकास काम थांबवण्यात रस असल्याचे यावरून जाहीर दिसले. परंतु आम्ही ते सर्व मनसुबे उधळून लावले असून बहुमताने सर्वच्या सर्व म्हणजे 34 विषय मंजूर केले आहेत असे डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या.