नंदुरबार : महाराष्ट्रात आदिवासी संस्कृतीचे चालिरीती, जीवनमान याचे नियोजन, मापन महाराष्ट्रात करण्याचे ठरवले आहे. यासाठी एक म्युझियम नागपुर येथे तर दुसरे म्युझियम नाशिक येथे करण्यात येणार आहे. नंदुरबार येथे आदिवासी सांस्कृतिक भवन उभारणार आहे. अशी माहिती आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी दिली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “आदिवासी संस्कृती असलेल्या जिल्ह्यांमध्ये म्युझियम, सांस्कृतिक भवन, ट्रेनिंग सेंटर ही सर्व उभारणार आहोत. याबद्दल आज मी आढावा घेतलेला आहे. याबद्दल संपूर्ण माहिती आराखडा तयार करण्यात येईल. त्यानंतर मंजुरीसाठी मंत्रीमंडळाकडे जाऊ. यासोबतच आम्ही भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा आणि वीर एकलव्य यांचा पुतळा नंदुरबार येथे उभारणार आहोत.” अशी माहिती विजयकुमार गावित यांनी दिली आहे.