बांधकाम मजूरांसाठी सुरक्षा व समृद्धीच्या विविध योजना, लाभ कसा मिळवायचा?

नंदुरबार : नोंदीत बांधकाम मजूरांना शासनाने महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व आर्थिक विषयक सुरक्षा व सुविधा देऊ केल्या असून, त्यांचे जीवन अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

धडगाव तालुक्यातील कात्री, सिसा, गौऱ्या, मांडलगाव, निगदी, धनाजे येथील बांधकाम मजुरांना सुरक्षा संच (सेफ्टी कीट) वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य गणेश राऊत, सरपंच सर्वश्री दिलीप वसावे(सरी), वीरसिंग पाडवी (जमाना), सर्वसौ जयश्री पावरा(सोनजा), रेवती वळवी (छापरी), शिवाजी पराडके, विश्वास मराठे, लतेश मोरे, सुनिल पावरा, राजेंद्र पावरा पंचक्राशितील बांधकाम मंजूर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून कामगारांचे जीवनमान व परस्थिती सुधारण्याबरोबरच बाल कामगारांना धोकादायक क्षेत्रात काम न करू देणे, तसेच कामगारांची रोजगार क्षमता आणि रोजगाराची संधी वाढवण्यावर भर दिला जात आहे. कामगारांच्या कौशल्य विकासाबरोबरच त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांसाठी काम करणे, कामगारांचे व्यवसायिक आरोग्य आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी धोरण किंवा कार्यक्रम करून कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून त्यांना घातक कामापासून, बाल श्रमांपासून मुक्त करून श्रम कायद्याच्या अंमलबजावणीचे बळकटीकरण केले जात आहे.

कामगार मित्रांच्या सुरक्षेसाठी राज्य शासन अनेक प्रकारचे साहित्य किंवा वस्तू बांधकाम कामगार योजनेंतर्गत देत असतात. त्याच पद्धतीने दरवर्षी कामगारांना बांधकाम कामगार पेटी योजनेतून सुरक्षा पेटी (सेफ्टी कीट) सुद्धा देतात. या पेटीमध्ये कामगार बांधवांच्या सुरक्षेसाठी विविध प्रकारच्या वस्तू दिल्या जातात. या वस्तूंच्या फायदा कामगार बांधव काम करताना घेऊ शकतात. बांधकाम कामगार पेटी योजनेंतर्गत तुम्हाला पेटी घ्यायची असेल तर, तुमचे नाव बांधकाम कामगार योजना अंतर्गत नोंदलेले असणे आवश्यक आहे. आणि नाव जर नोंदलेले असेल तर तुम्हाला लगेचच पेटी किट मिळेल. जे बांधकाम कामगार नवीन इमारत बांधकामात कामावर असतात व ते इमारत पूर्ण होईपर्यंत काम करतात. अशा सर्व कामगारांना या योजनेमार्फत लाभ मिळणार आहे. त्यासाठी कामगार राज्याच्या रहिवासी असावा, वय १८ वर्षे ते ६० वर्षे दरम्यान असावे, त्याने मागील वर्षांमध्ये ९० दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे, त्याने आपले नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेले असावे. कामगाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹ १ लाखाच्या आत असलेल्या व नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारचा पहिल्या दोन मुलांसाठी योजना लागू असल्याचेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

बांधकाम कामगार योजना पेटीसाठी अर्ज करण्यासाठी, अर्ज ऑफलाइन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने करू शकता. त्यासाठी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन महाराष्ट्र इमारत बांधकाम विभागात अर्ज करायचा आहे. किंवा महाराष्ट्र कामगार विभागाचा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा अर्ज करू शकता. त्यासाठी कामगार ओळखपत्र,आधार कार्ड, अर्जदाराच्या पासपोर्ट साईज फोटो, कामगाराच्या मूळ गावाच्या रहिवासी दाखला, बांधकाम कामगार म्हणून तीन महिने काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, वय वर्ष १८ पूर्ण असल्याचा पुरावा आवश्यक असून अर्ज केल्यानंतर काही दिवसात कामगारांना पेटी देण्यात येते, असेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

या प्रकारच्या कामगारांना दिला जातो लाभ

इमारती, रस्त्यावर, रस्ते, रेल्वे, ट्रामवेज, एअरफिल्ड, सिंचन, ड्रेनेज, तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह, निर्मिती, पारेषन आणि पॉवर वितरण, पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे, तेल आणि गॅसची स्थापना, इलेक्ट्रिक लाइन्स, वायरलेस, रेडिओ, दूरदर्शन, दूरध्वनी, टेलिग्राफ आणि ओव्हरसिज कम्युनिकेशन, डॅम, नद्या, रक्षक, पाणीपुरवठा, टनेल, पुल, पदवीधर, जल विदयुत, पाइपलाइन, टावर्स, कुलिंग टॉवर्स, ट्रान्समिशन टॉवर्स आणि अशा इतर कार्य, दगडे कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे, लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे, रंग, वार्निश लावने, इत्यादी सह सुतार काम, गटार व नळ जोडणीची कामे, वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादी सहित विद्युत कामे, अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे, उद्वाहाने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे, सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे, लोखंडाच्या किंवा धातूच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे, जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे, सुतार काम करणे, आभासी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरिस, यासहित अंतर्गत सजावटीचे कामे, काच कापणे, काचरोगण लावणे, व काचेची तावदाने बसविणे, कारखाना अधिनियम १९४८ खाली समावेश असलेल्या विटा छप्परावरील कौल इत्यादी तयार करणे, सौर तावदाने इत्यादी सारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे, स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडूलर आधुनिक युनिट बसविणे, सिमेंट काँक्रीटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे, माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवासी निवारे किंवा बस स्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे, रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी, सार्वजनिक उड्डाणे, पदपथ, रमणीय भूप्रदेश इत्यादींचे बांधकाम.