---Advertisement---
धुळे : नवी मुंबई येथे १३ सप्टेंबर रोजी एका गाडी चालकांने अरेरावी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असता वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा ड्रायव्हर यात सहभागी असल्याचे समोर आले होते. धुळ्यातून पूजा खेडकर कुटुंबियांचा ड्रायव्हर प्रदीप साळुंखे याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना मुलुंड-ऐरोली रोडवर घडली. २२ वर्षीय प्रल्हाद कुमार हा त्याचा काँक्रीट मिक्सर ट्रक चालवत असताना त्याची एसयूव्ही गाडीसोबत टक्कर झाली. या धडकेनंतर ट्रक चालक आणि एसयूव्ही गाडीतील दोघांमध्ये वाद झाला. एसयूव्ही गाडीच्या चालकाने स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे भासवून प्रल्हाद कुमार यांना पोलिस ठाण्यात नेण्याचे नाटक केले आणि जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवले.
नवी मुंबई पोलिसांनी 4 पथके स्थापन करून, खेडकरचा ड्रायव्हर साळुंखे याला काल सकाळी रबाळे पोलिसांनी धुळ्यातील सिंदखेडा येथून अटक केली आहे. दरम्यान, पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर, आई मनोरमा खेडकर आणि पुरावे नष्ट करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध नवी मुंबई पोलीस घेत आहेत.
निलंबित व वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अपहरण प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ऐरोली येथील ट्रान्झिट मिक्सर ट्रक हेल्परच्या अपहरणातील फरार आरोपी प्रफुल्ल ज्ञानेश्वर साळुंखे याला धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला १९ सप्टेंबर २०२५ रोजी ताब्यात घेतले आणि न्यायालयात हजर केले, जिथे त्याला २७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७:१५ वाजता मुलुंड-ऐरोली महामार्गावरील मॅकडोनाल्ड सिग्नलजवळ ट्रान्झिट मिक्सर ट्रक (MH-४६ CU-२७३८) आणि लँड क्रूझर कार (MH-१२ RP-५०००) यांची टक्कर झाली. अपघातानंतर, कार चालक आणि मालकाने ट्रक चालक आणि हेल्परकडून वाहन दुरुस्तीसाठी पैशांची मागणी केली. त्यांनी नकार दिल्याने ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार चौहानचे अपहरण करण्यात आले. या घटनेबाबत विलास धंगरे यांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पुण्यातील औंध येथील नॅशनल हाऊसिंग सोसायटीच्या घर क्रमांक ११२ मध्ये प्रल्हाद कुमारला ओलीस ठेवण्यात आल्याचे तपासात उघड झाले. त्याचा मोबाईल फोन हिसकावून घेण्यात आला, त्याला शिळे अन्न खायला देण्यात आले आणि चौकीदार आणि स्वयंपाकीच्या खोलीत डांबून ठेवण्यात आले. गाडीचे नुकसान भरपाई न मिळाल्यास अपहरणकर्त्यांनी गंभीर कारवाईची धमकी दिल्याचा आरोप आहे.