---Advertisement---

Drone Farming : शेतकऱ्यांना होणार आता मोठ्या प्रमाणावर फायदा!

---Advertisement---

 Drone Farming : देशभरात ड्रोन द्वारे पीकनिहाय फवारणी करण्याकरता प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी आणि समितीने याचा मसुदा तयार केला असून, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते या मसुद्याचे प्रकाशन करण्यात आलं आहे. त्यामुळे शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी कीटकनाशकांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांना ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी कीटकनाशकांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांना ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. या ड्रोन तंत्रज्ञानाचा लाभ शेतकरी, पदवीधर, लहान शेतकरी आदींसह शेवटच्या व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याकरता शासन प्रयत्न करणार असल्याचे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे.

या पिकांवर ड्रोनने फवारणी
सोयाबीन, कापूस, ऊस, गहू, भात, मका, भुईमूग, तूर, करडई, तीळ आदी दहा पिकांत ड्रोनचा वापराची प्रमाणित कार्यपद्धती निश्चित केली आहे.

अशी काळजी घ्यावी…
ड्रोनने फवारणी करताना शेतीतील मित्र किडीं आणि पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याबाबत काळजी घ्‍यावी लागणार आहे. सोयाबीनसारख्‍या स्वपरागित पिकांमध्‍ये फुलोऱ्या अवस्‍थेते ड्रोनद्वारे फवारणी टाळण्‍यात यावी अन्‍यथा पिकांचे नुकसान होऊ शकते. पिकांवर कीटकनाशकांची ड्रोनने फवारणी शक्‍यतो सकाळी किंवा सायंकाळी केल्‍यास जास्‍त प्रभावी ठरते. दुपारी किटकांच्‍या अळ्या मातीत लपलेल्‍या असतात. तसेच वाऱ्यांच्या वेग जास्‍त असल्‍यास, उष्‍ण वातावरणात, एक ते दोन दिवसात पावसाची शक्‍यता असताना ड्रोनने फवारणी न करण्‍याची शिफारस करण्‍यात आली आहे. ड्रोनद्वारे फवारणी चुकीच्या पद्धतीने केल्‍यास पर्यावरण दूषित होऊ शकते. यासर्व बाबी ड्रोन चालकांस माहिती असणे आवश्‍यक आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment