जळगाव : भररस्त्यात दारूच्या नशेत झोपलेल्या व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस थेट खड्ड्यात गेली. यावल शहरापासून सुमारे १ किलो अंतरावर आज सकाळी ही घटना घडली. यामध्ये तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहे.
यावल एसटी आगारातील बस क्रमांक (एमएच २० डी ९९७५) ही सकाळच्या सुमारास वड्रीकडून प्रवाशी घेवून यावलच्या दिशेने येत होती. दरम्यान, यावल शहरापासून सुमारे १ किलो मिटर लांब असलेल्या ठिकाणी एक दारूच्या नशेतचिंब असलेला दारूडा व्यक्ती आपली दुचाकी लावून रस्त्यावर झोपलेला होता. त्यास वाचविण्याच्या बस थेट खड्ड्यात गेल्याची घटना घडली.
या अपघातात तिन विद्यार्थीनी जखमी झाले आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना घडल्यानंतर त्या दारूड्याने वाहनचालकाशी हुज्जत घालून पळ काढला. या अपघाताची माहीती मिळताच यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी तात्काळ जख्मी रूग्णाची काळजी घेत त्यांना त्वरित उपचारासाठी शासकीय मदत केली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, यावल तालुक्यात खुलेआम हातभट्टीची गावटी दारू व पन्नी दारूची सर्वत्र विक्री होत असल्याचा हा परिणाम असल्याची संतप्त प्रतिक्रीया जख्मी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केल्या. एसटी चालकाने प्रसंगी दक्षता घेतली नसती तर मोठा अपघात झाला असता असे देखील अपघातास्थळी उपस्थित नागरीकांमध्ये बोलले जात आहे.