“तू हमको नहीं पहचानता क्या ?”, मद्यपींनी पैसे देण्यास नकार देत घातला गोंधळ

---Advertisement---

 

भुसावळ, प्रतिनिधी : मद्यपी दोन तरुणींनी “तू हमको पहचानता नहीं क्या ?” असे म्हणत पैसे देण्यास नकार देत गोंधळ घातला. त्यानंतर काउंटरवर ठेवलेली दोन हजार दोनशे रुपयांची रोकड जबरीने हिसकावून नेली. ही घटना भुसावळ शहरातील मानसिंग कॉम्प्लेक्समधील मधुर वाईन शॉपमध्ये घडली. या प्रकरणी बापारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रानुसार, भुसावळ शहरातील मानसिंग कॉम्प्लेक्समधील मधुर वाईन शॉपमध्ये रविवारी रात्री दोन मद्यपींनी क्वार्टरची मागणी केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले असता त्यांनी संतापून शिवीगाळ व आरडाओरड सुरू केली.

तसेच “तू हमको नही पहचानता क्या? किसी को भी रितिक नाम पूछ लेना” असे म्हणत त्यांनी धमक्या दिल्या. एकाने दुकान मालक पंकज जंगले यांच्यावर बाटली फेकून हल्ल्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याने कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. यात मालक पंकज जंगले यांच्या हाताला गंभीर जखम झाली.

याप्रकरणी मधुर वाईनचे मालक पंकज घनश्याम जंगले (वय ४५, रा. आदर्श नगर, जळगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार भुसावळ बापारपेठ पोलिस ठाण्यात दोघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.

काउंटरवरील रोकड लंपास

त्यानंतर काउंटरवर ठेवलेली दोन हजार दोनशे रुपयांची रोकड जबरीने हिसकावून नेली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---