Mumbai-Jalna Vande Bharat Express: मुंबई-जालनातील अंतर आता कमी होणार आहे. कारण यामार्गावर 8 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. रेल्वे बोर्डाने सहा वंदे भारत ट्रेनसंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे.
मध्य आणि उत्तर रेल्वेला प्रत्येकी दोन वंदे भारत, पश्चिम आणि दक्षिण रेल्वेला प्रत्येकी एक वंदे भारत देण्यात आली आहे.
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) प्रकल्पासाठी वंदे भारत मंजूर झाल्यामुळे, वंदे भारत आता काश्मीर खोऱ्यातूनही धावेल.
संत रामदास स्वामींचे जन्मस्थान, प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे आनंदी स्वामी मंदिर आणि इतर तीर्थक्षेत्रे जालन्यात आहेत. मुंबईकरांना वंदे भारत हा जलद आणि आरामदायी पर्याय उपलब्ध करून देईल.
वंदे भारतच्या 44व्या आणि 46व्या आठ डब्यांच्या गाड्या मध्य रेल्वेकडे सोपवण्यात आल्या आहेत. मुंबई-जालना मार्गावर एक गाडी धावणार आहे.
गाड्यांचे वेळापत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहितीरेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
या मार्गावर एकूण 5 वंदे भारत (वंदे भारत ट्रेन क्रमांक 44 ते 46) वितरित करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये 8 पैकी 4 डबे आणि 16 पैकी एक डबे आहेत.
रेल्वे बोर्डाच्या ऐश्वर्या सचान यांनी उत्तर रेल्वेवरील यूएसबीआरएल प्रकल्पासाठी एक वंदे भारत आरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत.