Earthquake : भल्या पहाटे लेह-लडाखमध्ये भूकंपाचे धक्के

Earthquake  लडाखमधील लेहमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने (एनसीएस) दिलेल्या माहितीनुसार, लेह आणि लडाखमध्ये मंगळवारी पहाटे 4 वाजून 33 मिनिटांनी 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला.

भूकंपाचा केंद्रबिंदू 5 किमी खोलीवर होता आणि 34.73 अक्षांश आणि 77.07 रेखांशावर भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच जम्मू-काश्मीरजवळील किश्तवाड जिल्ह्यात 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, किश्तवाडमध्ये मध्यरात्री 1 वाजून 10 मिनिटांनी 5 किमी खोलीवर भूकंप झाला.

मात्र डोंगराळ भागात अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.