अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

तरुण भारत लाईव्ह ।९ मार्च २०२३। अफगाणिस्तानला सात दिवसांत तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. आज पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेत. या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केलवर इतकी आहे. गुरुवारी सकाळी भूकंपाचा झटका बसला.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमधील फैजाबाद जिल्ह्यात आज सकाळी 7.06 वाजता हा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी मोजण्यात आली आहे. अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा जमीन हादरली असून फैजाबादपासून 285 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू 107 किलोमीटर खोल होता. अफगाणिस्तानला सात दिवसांत तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला असून आज पुन्हा भूकंपाचा झटका बसला. भूकंपाचे धक्के जाणवत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

याआधी एका फ्रेंच शास्त्रज्ञाने ही भारतात येत्या काळात भूकंप येणार असल्याचं भाकित केलं आहे. याच भूर्गभशास्त्रज्ञाने तुर्की आणि सीरियाच्या भूकंपाबाबत वर्तवलेला अंदाजही खरा ठरला आहे. भूगर्भशास्त्रज्ञ आणि डच संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनी भारतातही भूकंप होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. हूगरबीट्स यांनी भारताबद्दल भाकित करत सांगितलं आहे की, भारताला मोठा भूकंपाचा धक्का बसणार आहे. हिंद महासागर क्षेत्रातील देश म्हणजे भारत, पाकिस्तानसह अफगाणिस्तानलाही याचा झटका बसणार आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी चीन आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत.