उत्तरकाशीला भूकंपाचे धक्के; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

तरुण भारत लाईव्ह ।०५ मार्च २०२३। उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले जमीन हादरल्याने नागरिक भयभीत झाले होते. भारतीय हवामान विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार भूकंपाची तीव्रता २.५ रिक्टर स्केल आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये मध्यरात्री भूकंपाचे तीन धक्के बसले आहे. रात्री १२ वाजून ४५ मि उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भूकंप झाला. १२ वाजून ४० मि भूकंपाचा पहिला धक्का बसला. दुसरा १२.४५ तर तिसरा झटका १ वाजून १ मिनिटाने बसला. भूकंपाचे हादरे बसताच लोक घरातून बाहेर पडले. सुदैवाने या भूकंपात आतापर्यंत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार रात्री १२.४५ वाजता बसलेला भूकंपाचा धक्का २.५ रिक्टर स्केलचा होता. त्याचं केंद्र भटवाडी तहसीलअंतर्गत सिरोर जंगलामध्ये होतं. उत्तरकाशी येथील स्थानिक नागरिकानीं सांगितलं की, अचानक खिडकी, दरवाजांचा जोरात आवाज येऊ लागला. सोबत किचनमध्ये भांडे आदळत होते. त्यामुळे घराबाहेर पडलेले लोक रात्रभर घराबाहेर बसून होते.