तरुण भारत लाईव्ह । १९ जानेवारी २०२३। लहानमुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना बर्गर हा आवडतोच. व्हेज बर्गर, नॉन व्हेज बर्गर असे दोन प्रकारचे बर्गर बाजारात मिळतात. पण बाहेर जाऊन खाण्याची इच्छा नसेल तर तुम्ही हा घरी अगदी रेस्टोरंट सारखा बनवता येतो त्याची साहित्य आणि कृती जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
काकडी, चीझ, कांदा, कोबी, टॅमोटो, बन्स, टमाटो सॉस, हिरवी चटणी. आवश्यकतेनुसार चाट मसाला.
कृती
प्रथम टिक्की बनवण्यासाठी बटाटे किसून घ्यावे. या बटाट्यामध्ये हळद, तिखट, मीठ, चाट मसाला, धने जिरे पूड, हिरवी मिरची आणि कुटलेले बारीक ब्रेड त्यात मिक्स करा. बटाट्याचे जे मिश्रण बनवले आहे त्याचे छोटे गोळे करून त्यावर हलकासा दाब देऊन ते सपाट करा. नंतर ते ब्रेडच्या चुरा मध्ये पसरवा. तव्यावर तेल गरम करून त्यावर टिक्की दोन्ही बाजूनी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. आता काकडीचे गोल काप करून घ्या त्याप्रमाणेच टॅमोटो चे गोल काप करून घ्यावे. बर्गर बनवण्यासाठी बनचा एक तुकडा घ्या त्यावर हिरवी चटणी आणि काकडीचे आणि टॅमोटोचे गोल काप बर्गर मध्ये ठेवा. त्यानंतर चाट मसाला त्यामध्ये टाका आणि चीझचे तुकडे ठेवा. अशा प्रकारे बर्गर टॅमोटो सॉस सोबत सर्व्ह करा.