महामार्ग बायपासवर भीषण अपघात; इको कार चक्काचूर, सुदैवाने दोघे बचावले!

---Advertisement---

 

जळगाव : कंटेनरच्या धडकेत इको कार चक्काचूर झाली. या वाहनातील दोघे बालंबाल बचावले असून ते किरकोळ जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावर शहरालगतच्या आव्हाणे शिवारातील बायपासवर ही घटना घडली.

सुत्रांच्या माहितीनुसार आव्हाणे शिवारात कानळदा रस्त्यावरील महामार्गावरील बायपासवरुन इको कार जात होती. त्याचवेळी कंटेनर भरधाव घेगाने येत होता. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने धडक होऊन इको कार चक्नाचुर झाली. कंटेनरच्या इंधन टाकीला धडकेत धक्का बसल्याने त्यातील डिझेलची धार लागली होती.

बायपास वळणदार असल्याने वाहने सावधगिरीने चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. परंतु चालकांचे वेगावर नियंत्रण सुटल्यानंतर अपघाताला निमंत्रण मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. आज सायंकाळी वाहन चालकांचे वेगावर नियंत्रण सुटल्याने अपघाताला स्वरुप मिळाले, असे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. दरम्यान तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. अपघाताच्या नेमके कारणाचा शोध घेतला जात असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.


तालुका पोलिसांकडून शोध सुरु


महामार्ग बायपासवर झालेल्या या भीषण अपघातात नेमके कोण प्रवासी आहेत याचा रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस शोध घेत होते. तसेच कारमधील जखमींना खासगी रुग्णालयात हलविण्यात आल्याचा तर्क लावला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---