---Advertisement---

काँग्रेससह भाजपा नेत्यांच्या घरांवरही ईडीचे छापे; काय आहे प्रकरण?

---Advertisement---

नवी दिल्ली : केंद्र सरकार राजकीय विरोधकांच्या विरोधात ईडीचा वापर करतो, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. आताही ईडीने गुरुवारी हरियाणातील अनेक ठिकाणी छापे टाकले. ईडीने सोनीपत, कर्नाल आणि यमुनानगर येथील काँग्रेस नेत्यांच्या घरांवर धाडी टाकल्या आहेत. विशेष बाब म्हणजे यात भाजप नेत्यांच्या घरांवरही ईडीचे धाडी टाकल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, सध्या ईडीची छापेमारी सुरू आहे. सोनीपतमधील बेकायदेशीर खाणकाम संदर्भात ईडीच्या अनेक टीम काँग्रेस आमदार सुरेंद्र पंवार यांच्या घरी पोहोचल्या. काँग्रेस आमदार सुरेंद्र पंवार यांच्या घरी ईडीचे अधिकारी खाणकामाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करत आहेत.

दुसरीकडे भाजपा नेते मनोज वधवा यांच्या कर्नाल येथील घरावर ईडीने छापा टाकला आहे. मनोज वाधवा यांचे घर सेक्टर 13 मध्ये आहे, जिथे ईडीची टीम कागदपत्रे स्कॅन करत आहे. वाधवा हे यमुनानगर येथील खाण व्यवसायाशी संबंधित आहेत.

2014 मध्ये त्यांनी मनोहर लाल यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तसेच ईडीची टीम यमुनानगर येथील माजी आमदार दिलबाग सिंह यांच्या घरीही पोहोचली आहे. यमुनानगर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील अवैध उत्खननाविरोधात हा छापा टाकण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment