---Advertisement---

सामान्यांना दिलासा ! खाद्यतेल झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

---Advertisement---

Edible oil prices : दैनंदिन वापरातील जवळपास सर्वच वस्तूंचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच चटका जाणवत आहे. अशातच केंद्र सरकारने कच्चे पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमा शुल्क २० टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. यामुळे खाद्यतेलाचे दर कमी झाले असून, गृहिणींना काहीचा दिलासा मिळणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून दैनंदिन वापरातील जवळपास सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने सर्वसामान्य लोकांचे बजेट कोलमडले आहे. अशातच केंद्र सरकारने कच्चे पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील १० टक्के दर कमी केले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे खाद्य तेलांच्या दरात १० रुपयांनी घसरण झाली असून, गृहिणींना काहीचा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, भारत सरकार खाद्यतेलाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त गरजा आयातीद्वारे पूर्ण करीत असतो. मात्र, सध्या तेलाचे दर स्थिर झाले असले तरी एक ते दीड महिन्यांनंतर दरात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.

असे आहेत खाद्य तेलाचे किलोचे दर
सोयाबीन : दर १२५ (पूर्वी १३५ ते १४०)
शेंगदाणा : दर १९० (पूर्वी दर २००)
सूर्यफूल : दर १५० ते १५५ (पूर्वी दर १६०)
तीळ : दर २३० (पूर्वी दर २५०)
पाम : दर १२५ (पूर्वी दर १३५ ते १४०)

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---