‘एगलेस चॉकलेट केक’ कसा बनवाल?

तरुण भारत लाईव्ह ।०२ मार्च २०२३।केक तर सगळ्यांनाच आवडतो पण बरेच जण त्यामध्ये  अंड म्हणून खात नाहीत. पण तुम्हाला माहित आहे का? चॉकलेट एगलेस केक तुम्ही घरी करून खाऊ शकता. चॉकलेट एगलेस केक घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
पीठ, कोको पावडर, योगर्ट, पिठीसाखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, व्हेनिला एसेंस, बटर, चॉकलेट चिप्स, चिरलेले बदाम, पाणी

कृती
सर्वप्रथम एका बेकिंग डिशवर तेल किंवा साजूक तूपाने ग्रिसींग करा. थोडा मैदा घेऊन बेकिंग डिशवर पसरवून बाजूला ठेवा. आता एका बाऊलमध्ये दही आणि पिठीसाखर घेऊन मिश्रण चांगले ढवळून घ्या. त्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स करा. मैदा आणि कोको पावडर घेऊन सर्व साहित्य चांगलं एकजीव करा. त्यामध्ये तेल किंवा साजूक तूप घाला नंतर मिश्रणात व्हेनिला इसेन्स आणि मीठ घालून सर्व सामग्री नीट एकजीव करा. आता त्यामध्ये चोको चिप्स आणि तुकडे केलेले बदाम घाला. ओव्हन १० मिनिटे गरम करुन घ्या. आता केक मऊशार आणि फुगीर होईपर्यंत ३५ ते ४० मिनिटे ओव्हनमध्ये ठेवा. आता केक ओव्हनमधून काढून काही वेळ थंड होऊ द्या. नंतर केकचे लहान लहान तुकडे करा. अशाप्रकारे तयार झालाय आपला मऊशार आणि टेस्टी असा एगलेस चॉकलेट केक!