‘त्या’ वक्तव्यानंतर एकनाथ खडसेंचा आव्हाडांना सल्ला; वाचा काय म्हणालेय ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे प्रभू रामावर वादग्रस्त वक्तव्य करून अडचणीत आले आहेत. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या अटकेची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जितेंद्र आव्हाडांना एक सल्ला दिला आहे.

काय म्हणाले आहे खडसे ?
माझ्या वडीलकीच्या नात्याने जितेंद्र आव्हाड यांना सल्ला आहे की, वाद होईल असा कोणताही मुद्दा हातात घेऊ नका, असे खडसे यांनी म्हटले आहे. ते राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील शिबिरात बोलत होते.

काय म्हणाले होते आव्हाड ?
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आहवाड यांनी भगवान राम यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. राम मांसाहारी असल्याचे त्यांनी म्हटले होते. ते जंगलात शिकार करून खात. ते म्हणाले की 14 वर्षे जंगलात राहणारा माणूस शाकाहारी कसा होऊ शकतो ? त्यामुळे राम शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. आव्हाड यांच्या या वक्तव्यावर भाजपमध्ये संताप व्यक्त होत आहे. मुंबईत भाजप आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.