Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचा नवा गौप्यस्फोट; वाचा काय म्हणाले आहे?

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विरोधी पक्षनेता निवडीनंतर मोठा सौपयस्पोट केला आहे. त्यांनी विजय वडेट्टीवार यांची विरोधीपक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन केलं. त्यांनतर त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

काय म्हणाले आहे मुख्यंमत्री?
आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी २०१४ मधील आठवण सांगितली.  त्यावेळी शिवसेनेने विरोधात बसण्याची भूमिका घेत, एकनाथ शिंदे हे विरोधीपक्षनेते बनवले होते. त्यावेळची आठवण शिंदे यांनी सांगितली. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर शिवसेना विरोधात होती. त्यावेळी फडणवीसांनी मला सांगितलं होतं की, विरोधीपक्षनेता होऊ नका.

आपल्याला सरकारमध्ये काम करायचं, असा गौप्यस्फोट शिंदे यांनी केला. याआधी एकनाथ शिंदे यांनी अनेकदा देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे. समृद्धी महामार्ग उभारणीत दोघांचं मोठं योगदान होतं. शिवसेनेत बंड घडवून आणताना शिंदेंना देवेंद्र फडणवीसांनी मोठं सहकार्य केलं, हे सर्वश्रूत आहे. आज शिंदे यांनी फडणवीसांबाबत आणखी एक गौप्यस्फोट केला आहे.